Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचेही दर 1168 रुपयांनी झाले कमी

Gold fell, silver also fell by Rs 1,168 रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.

एमपीसी न्यूज- रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 488 रुपये म्हणजे सुमारे 500 रुपयांनी कमी झाले. दिल्लीत सोन्याचा भाव 49,135 रुपये प्रती ग्रॅम इतका होता. बुधवारी सोन्याचा दर 49,623 रुपये प्रती 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीच्या किंमतीतही 1168 रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा दर प्रती किलो 50,326 रुपये इतका होता.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. गुरुवारी रुपयात 56 पैशाची सुधारणा होत 75.04 रुपये प्रती डॉलर बंद झाला होता.

मंगळवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 8 वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचले होते. त्याचा दर प्रती औंस 1800 डॉलरच्या वर होता. त्यामुळे बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात तेजी आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.