Manjari : मनसे कार्यकर्त्याचा सुपारी देऊन खूनाच्या प्रयत्नप्रकरणी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा

तब्बल 10 लाखांची दिली होती सुपारी, 3 आरोपींना अटक, 3 जण फरार

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विशाल ढेरे यांच्या खुनाची 10 लाखांची सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरीचे सरपंच व इतर 6 जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोसीन मुनीर पठाण (वय 20), दीपक भंडलकर (वय 26 रा. वाघोली), शाहीद पटेल (वय 23 रा. वडगाव शेरी) या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी अटक केलेली आहे. तर शिवराज घुले (वय 42), प्रमोद कोद्रे (वय 42), संतोष भंडारी (वय 32) हे  आरोपी फरार आहेत. याप्रकरणी विशाल ढोरे (वय 38 रा. मांजरी फार्म) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, विशाल ढोरे यांचे मांजरी गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कोद्रे व सरपंच शिवराज घुले यांच्याशी पूर्वीपासूनचे राजकीय वैमनस्य आहे.निलंबित पोलीस संतोष भंडारी याला हाताशी धरून सरपंच शिवराज घुले व प्रमोद कोद्रे यांनी दीपक भंडलकर या सराईत गुन्हेगाराला विशाल ढोरे यांना जीवे मारण्याची दहा लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार दीपक भंडलकर हा मोसीन पठाण, इरफान पठाण व शाहीद पटेल यांना घेऊन मांजरी फार्म परिसरात येऊन गेले काही दिवस रेकी करून विशाल ढोरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता.

दरम्यान, विशाल ढोरे यांना अज्ञात इसमाचा आपणास जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण घराच्या बाहेर पडू नका असा वारंवार फोन येत होता. या फोन नंबरच्या आधारे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी हडपसर तपास पथकाचे अधिकारी संजय चव्हाण व मंगेश भांगे यांच्यासह सापळा रचून मांजरी फार्म येथील शाहीद पटेल याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.