Lonavala : राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या वतीने वडगाव येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या वतीने वडगाव येथील विराज हॉल, साई समर्थनगर येथे रविवारी सकाळी १० वाजता नवनिर्वाचित पर्यावरण राज्यमंत्री नामदार बाळा भेगडे व विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, सिनेअभिनेत्री सुजाता मोगल यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळस्कर-थिटे, उपाध्यक्ष शिवदास महाजन, सहउपाध्यक्ष गोविंद जाधव, सचिव डॉ आरती म्हाळस्कर, सह सचिव शंकर बागडी, राष्ट्रीय फडणवीस मनसुख परिहार, संदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.