GST Reduction : लसीवर 5 टक्के जीएसटी कायम, कोरोना सबंधित औषधे आणि उपकरणांच्या ‘जीएसटी’त कपात

एमपीसी न्यूज – कोरोना सबंधित औषधे आणि उपकरणांच्या ‘जीएसटी’त कपात करण्यात आली आहे. लसीवर मात्र, 5 टक्के ‘जीएसटी’ कायम राहणार आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 44 वी बैठक आज (शनिवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कोविड -19 मध्ये मदत आणि व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंवरील जीएसटी दरात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीएसटी परिषदेने लसींवर पाच टक्के कर दर कायम ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. रुग्णवाहिकांवरचा जीएसटी 28 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. पल्स ऑक्सिमीटर वरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजन कंसेन्ट्रेटरवर कर कमी केला आहे. ब्लॅक फंगसच्या औषधांवर कोणताही कर लावला जाणार नाही. व्हेंटिलेटर वरील जीएसटी ही 12 वरून 5 टक्क्यांवर आणला आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिविर या औषधावरील करही कमी करण्यात आला आहे. तो 12 ते 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

ब्लॅक फंगसचे आणि टोसिलिजुमाब इंजेक्शनवर आधी 5 टक्के कर होता. तो कर रद्द करण्यात आला आहे. कोरोना टेस्टिंग किट वरील कर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच हँड सॅनिटायझरवरील कर 18 ते 5 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.