Hadapsar : डोक्यात सिमेंटचा दगड पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू ; ठेकेदारास अटक

एमपीसी न्यूज – डोक्यात सिमेंटचा दगड पडून कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी बांधकाम ठेकेदाराला अटक करण्यात आली. ही घटना 2 मे २०१८ रोजी दुपारी चारच्या दरम्यान मांजरी रोड वरील गोविंद सुभाषनगर येथे घडली होती.

येमलाप्पा भिमशाप्पा चव्हाण (वय 55, रा. हिंगणेमळा, हडपसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर मारूती लक्ष्मण गुंजवटे (वय 50. रा. हिंगणेमळा, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी मगर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रोड वरील गोविंद सुभाषनगर येथे ठेकेदार मारूती गुंजवटे यांच्या देखरेखीखाली अजित वाडेकर यांचे खोली पाडण्याचे काम सुरू होते. या कामाच्या वेळी ठेकेदार मारूती गुंजवटे यांनी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवली नाहीत. खोलीचा पोटमाळा पाडताना येमलाप्पा चव्हाण यांच्या डोक्यात सिमेंटचा दगड पडला. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी ठेकेदार मारूती गुंजवटे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.