Hadapsar : कोयता गॅंगचे लोण आता शाळेतही; क्षुल्लक कारणावरून शाळकरी मुलांनी केला कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज : कोयता गँग कमी होण्याचे (Hadapsar) नाव घेत नसून कोयत्याचे लोण आता शाळकरी मुलांमध्ये पोहचले आहे. तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, ही घटना मंगळवारी (दि. 25 जुलै, 2023) हडपसर पांढरमेळा येथे घडली. पोलिसांनी सांगितले की, शाळा सुटल्यानंतर हल्लेखोर विद्यार्थी व त्याच्या मित्रांनी अल्पवयीन मित्राला तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस असा जाब विचारत कोयत्याने हल्ला केला.

Kirkitwadi : पोलिसांना घाबरत नाही म्हणत लोकांना त्रास देणाऱ्या वैभव इक्करची पोलिसांनी काढली धिंड

यावेळी आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिक (Hadapsar) जमा झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.