Talegaon : तळेगाव येथे 43 बगळ्यांना जीवनदान

एमपीसी न्यूज – शेकडो पक्षी राहत असलेले (Talegaon) बाभळीचे झाड अचानक कोसळले. यामध्ये काही पक्षी जखमी झाले. या जखमी पक्षांना वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि वनविभागाच्या मदतीने काढून रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या भुगाव येथील केंद्रावर उपचारासाठी पाठवण्यात आले. यामध्ये 43 बगळ्यांचा जीव वाचला असून तीन बगळे मृत पावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव दाभाडे नगरपरिषद ऊद्यान विभागाचे प्रमुख सिध्देश्वर महाजन यांचा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांना फोन आला. जिजामाता चौकाजवळ जितेंद्र कदम यांच्या घरावर एक बाबळीचे झाड पडले आहे. त्या झाडावर पक्ष्यांची घरटी आहेत. ते झाड विजेच्या तारांवर पडले आहे. त्यामुळे डोळसनाथ कॅालनी मधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Hadapsar : कोयता गॅंगचे लोण आता शाळेतही; क्षुल्लक कारणावरून शाळकरी मुलांनी केला कोयत्याने हल्ला

झाडावरील पक्ष्यांना वाचविण्यासाठी संस्थेचे सदस्य जिगर सोळंकी तिथे पोचले आणि त्यांनी पाहणी केली. अनेक बगळे राहत असलेले झाड पडल्याने ते पक्षी बेघर झाले होते. संस्थेचे सहकारी किरण मोकाशी, श्रेयस कांबळे, प्रियांका शर्मा, जिगर सोलंकी, विकी दौंडकर, गणेश निसाळ, गणेश ढोरे, भास्कर माळी, अनिश गराडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी झाडावर अडकलेल्या बगळ्यांच्या पिल्लांना बाहेर काढले. त्यात (Talegaon) एकूण 43 पिल्ले आढळली. तर तीन पिल्ले मरण पावली.

पुणे वन विभागाचे आशुतोष शेंडगे, वडगांव मावळचे रेंज ॲाफीसर हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांना बोलावून घेत वनपाल एन के हिरेमट, वनरक्षक योगेश कोकाटे, वन सेवक किसन गावडे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थे सदस्य उपस्थित राहून सगळे पक्षी सुखरूप रेस्क्यू टीमच्या ताब्यात देऊन पुढील उपचारा साठी रेसॅकु सेंटर भुगांव येथे पाठवण्यात आले.

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या प्राणीमित्र अथवा वनविभागला संपर्क (1926) करावा. असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि आध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.