Hadapsar : हडपसरचा रिल्स बादशहा तासाभरात वठणीवर

एमपीसी न्यूज – सोशल मीडियाच्या माध्यमातून नको ते व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्ध होण्याचे (Hadapsar) फॅड हल्ली वाढले आहे. पुण्यात यापूर्वी थेरगाव क्वीन नावाने असलेली व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर असाच काहीसा प्रकार आता हडपसर परिसरातून उघडकीस आला आहे. रिल्स तयार करून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या.

पवन संतोष भारती (वय 20, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी तरुणाने रिल्सच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने “हे हडपसर गाव आहे, इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालती बादशहा” असा डायलॉग वापरला होता. अशा प्रकारचं व्हिडिओ तयार करून त्याने थेट पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचेही या माध्यमातून दिसून आले.
तर अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीसांनी तत्काळ याची दखल घेतली. अवघ्या काही तासात त्याला (Hadapsar)  हडपसर परिसरातून अटक करण्यात आली. त्यानंतर अशा प्रकारचा व्हिडिओ पुन्हा करणार नाही असा माफीनामाही त्याच्याकडून वदवून घेण्यात आलाय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.