Wagholi : दारू पिताना झालेल्या भांडणातून एकाचा धारदार हत्याराने खून

एमपीसी न्यूज – दारू पिताना भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात दोघांनी एकावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घृण ( Wagholi ) खून केलाय. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली येथील सिट्रोन सोसायटी समोर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Hadapsar : दहशत माजविणाऱ्या जुन्नी टोळीविरुद्ध मोका कारवाई

शैलेश माडगेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (रा. बेरळी बुद्रुक मुखेड, जिल्हा नांदेड) आणि गोपाल ज्ञानोबा कोटलापुरे (वय 25, रा.नांदेड नाका,महादेव नगर ,लातूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. संगम चंद्रशेखर धारिया यांनी या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी बसले होते. आरोपी राम श्रीराम त्याच्या सांगण्यावरून ठेकेदाराने शैलेश याला कामावरून काढून टाकले असा संशय शैलेशला होता. रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आरोपींना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी ही रागाच्या भरात धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर अनेक कपाळावर वार करून त्याचा खून केला.
खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Wagholi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.