Hadapsar : आजाराला कंटाळून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांकडून (Hadapsar) आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई, वडील आणि मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तर यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील हडपसर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

कॅन्सर सारख्या आजाराला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.  सूर्यप्रकाश अबनावे (वय 72), मुलगा चेतन अबनावे (वय 40) आणि जनाबाई अबनावे (वय 60) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चेतन अबनावे हा स्वतः आजारी असायचा. त्याला अनेक वेळा फीट येत होत्या. शिवाय त्याच्या आईला कॅन्सर होता. आजारपणाला कंटाळून या तिघांनी जीवन संपवायचं ठरवलं.

Pimpri : यमुनानगर मधील फुटपाथ दुरुस्त करण्याची मागणी

आज संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या (Hadapsar) घरी जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  यात वडिलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलगा हे शेजारच्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी घटना घडताच त्यांना रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.