Lata Mangeshkar : वयाच्या 55 व्या वर्षी लतादीदी यांनी गायलेले एकमेव इंग्लिश गाणं तुम्ही ऐकलंय का? 

एमपीसी न्यूज – गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत. त्यांच्या आवाजाने अनेकांना मोहीनी घातली आणि येणारी अनेक दशकं त्यांच्या आवाजाची जादू रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिल. पु.लं देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे तर ‘एक सूर्य, एक चंद्र आणि एकच लता’ हे विशेषण त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरतं. 

भारताची नाईटेंगेल अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात विविध भाषांमध्ये जवळपास 28 ते 30 हजार गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का लतादीदी यांनी इंग्रजीत देखील गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी हे गाणं गायलं आहे. फार कमी लोकांना माहिती असलेला हा किस्सा नक्की काय आहे ? आपण सविस्तर पाहुया.

तर, झालं असं की टोरोंटो येथे एक चॅरिटी कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. लतादीदी यांना या कॉन्सर्टसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या ऍनी मरे या देखील उपस्थित होत्या. मरे यांच्या ‘यु निडेड मी’ हे गाणं लतादीदी यांनी गावं अशी विनंती ऍनी मरे यांनी केली. आणि त्यानंतर लतादीदी यांनी हसत हसत गाणं गाण्यासाठी होकार दिला व लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी ‘यु निडेड मी’ हे गाणं गायलं.

इंग्रजी भाषेत गायलेले लतादीदी यांच हे एकमेव गाणं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हे गाणं गायलं असल्यानं वय वाढत असलं तरी लतादीदी यांनी विविध प्रयोग करणं कधीही सोडलं नाही ही  महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

लतादीदी यांनी गायलेल्या ‘यु निडेड मी’ गाण्याची लिंक 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.