Farmer Dies in Chakan : हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – शेतात ट्रॅक्टर चालवताना चालकाच्या जवळ बसलेल्या शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून जागीच मृत्यू (Farmer Dies in Chakan)  झाल्याची घटना घडली आहे. चाकण ( ता. खेड ) येथील भुजबळ आळी येथील शिवारात बुधवारी (दि. 22) सायंकाळच्या सुमारास सदरील घटना घडली आहे.

शिवाजी सीताराम तोडकर ( वय 55, रा.भुजबळ आळी, चाकण, ता. खेड ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तोडकर यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर ने शेतीला रोटर करत असताना चालत्या ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून शेतकरी तोडकर यांचा मृत्यू (Farmer Dies in Chakan)  झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रोटावेटर मध्ये अडकलेला मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत होता.

Water Wastage: पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

चाकण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर मध्ये अडकलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. चाकण ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. प्रगतीशील शेतकरी अशी ओळख असलेल्या शिवाजी तोडकर यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. चाकण मधील सामाजिक कार्यकर्त्या विजया तोडकर यांचे ते वडील होते.

Maharashtra Political Crisis Sanjay Raut : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण…; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.