_MPC_DIR_MPU_III

Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे विप्रो सर्कल हिंजवडी येथे झाला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

रविदास भोळा (वय 30) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार जी एल राजेभोसले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदास गुरुवारी पहाटे हिंजवडी येथील विप्रो सर्कल येथून पायी चालत जात होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवीत रविदास यांना धडक दिली. या अपघातात रविदास गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.