Hinjawadi : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 24 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत (Hinjawadi)एका व्यक्तीची 24 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडली.

संतोष नवनाथ कदम (वय 42, रा. भुजबळ चौक, वाकड) यांनी(Hinjawadi) याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यानुसार अनुराग ठाकूर, कौशल शर्मा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : स्वस्त दरात सिमेंट विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी कदम यांना शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गुंतवणुकीच्या बहाण्याने कदम यांचा विश्वास आरोपींनी संपादन केला. त्यांना के के आर सी ए स्टंडिंग ग्रुप एल 3 व्हीआयपी 226 या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. कदम यांनी 25 लाख 30 हजार रुपये गुंतवणूक केली.

 

त्यानंतर कदम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांना एक लाख 15 हजार रुपये परत दिले. उर्वरित 24 लाख 15 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

https://www.youtube.com/watch?v=tnaCrgfh7Qc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.