Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बावधन येथे टाटा शोरूम समोर गुरुवारी (दि. 2) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

याप्रकरणी रोहीत किसन ओव्हाळ (वय 23, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव विठ्ठल कांबळे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी रोहित यांचे मामा मृत भीमराव हे त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 11 / झेड 0143) कात्रज-देहुरोड बायपास वरून बाणेरकडे जात होते. ते बावधन येथे टोयोटा शोरूम समोर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये भीमराव यांच्या उजव्या पायास व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.