Dehuroad : मुलीशी भांडण केले म्हणून सासू-सासर्‍यांनी जावयाला बदडले

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून मुलीचे जावयाची भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून सासू-सासर्‍यांनी जावयाला बदडून काढले. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गारमाळ धायरी येथे घडली.

आकाश यशवंत जालगी (वय 31, रा. गारमाळ धायरी) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरे महेश गोविंद येलगुंडी, सासू यशोदा महेश येलगुंडी व चुलत सासरे पांडुरंग येलगुंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि त्यांची पत्नी यांचे घरगुती कारणांवरून भांडण झाले. या भांडणाची कुजबुज आरोपी सासू-सासरे यांच्या कानावर गेली. त्यामुळे चिडलेल्या सासू-सासर्‍यांनी जावई आकाश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये आकाश यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.