Hinjawadi : दुकानातून संगणक, कॅमे-यासह फोटो चोरीला

एमपीसी न्यूज – दुकान फोडून दुकानातून संगणक, कॅमेरा, मोबाईल फोन आणि फोटो असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार कोयते वस्ती, पुनावळे येथे गुरुवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत दुकानदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राजुराम सुखराम बिष्णोई (वय 24, रा. सिल्वर लँड, रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजुराम यांचे पुनावळे येथील कोयते वस्ती येथे स्वराज्य मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि. 23) रात्री साडेदहाच्या सुमारास राजुराम यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून मोबाईल फोन, संगणक, कॅमेरा आणि फोटो असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.