सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Hinjawadi Crime News : बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – माणगाव येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यात पोलिसांनी 48 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेतले आहे.

तिमप्पा नारायन गानेगा (वय 35, रा. माणगाव, ता.मुळशी ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई रवी पवार यांना माहिती मिळाली की, माणगाव येथे एक व्हिडीओ गेम सेंटर बेकायदेशीरपणे सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी गेम सेंटरवर छापा टाकला. त्यात आरोपी तिमप्पा गेम सेंटर चालवत असताना आढळून आला.

त्याच्याकडे गेम सेंटरच्या परवान्याबाबत चौकशी केली असता तो बेकायदेशीरपणे व्हिडीओ गेम सेंटर चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिमप्पा याला ताब्यात घेऊन 48 हजार 820 रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन, रोख रक्कम जप्त केली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news