Hinjawadi : ‘ड्राय डे’ला दारू पिणं पडलं 50 हजारांना

एमपीसी न्यूज – “ड्राय डे’च्या दिवशी ऑनलाइन दारू खरेदी करणाऱ्या एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 9) बावधन येथे घडली.

पियाली दुलाल कर (वय 32, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 9350859438 या मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पियाली यांनी ऑनलाइन घुले वाईन शॉप यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र आज ड्राय डे असल्याने तुम्ही ऑनलाइन बुकींग करा, मी आपल्या पत्त्यावर दारू पाठवितो, असे फोनवरील व्यक्‍तीने सांगितले. त्यानुसार फिर्यादी पियाली यांनी ओटीपी नंबर शेअर केला असता त्यांच्या बॅंक खात्यातून प्रथम 31 हजार 777 आणि त्यानंतर 19 हजार 1 रुपये असे एकूण 50 हजार 778 रुपये काढून घेतले आणि दारू न देता फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.