Hinjawadi : कार शोरूमच्या कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची अफरातफर

एमपीसी न्यूज – कार बुकिंगच्या 3 लाख रुपयांची  शोरूम कर्मचाऱ्याने अफरातफर ( Hinjawadi ) केली आहे.ही घटना बाणेर येथील टाटा गारवे शोरुम येथे 2 ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी दत्तात्रय जाधव (वय 49 रा.मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून लक्ष्मण बापू पवार (रा,मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी  हा शोरुम मध्ये कर्मचारी म्हणून काम करतो. त्याने कार बुकिंग साठी आलेली 3 लाख 4 हजार 8440 रुपयांची रक्कम शोरुमच्या बँक खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा अपहार केला. यावरून हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Hinjawadi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.