Hinjawadi : धारदार शस्त्राने वार करत दोघांना लुटले; चोरट्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने वार करत दोघांना लुटले. हिंजवडी आणि निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटना बुधवारी (दि. 17) रात्री घडल्या.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर बावधन येथील सुतारवाडी नवीन पुलाजवळ एका ट्रक चालकाला लुटले. याप्रकरणी अनिलकुमार अमरसिंग पटेल (वय 24, रा. कलमदपुर बडगाव, ता. सु रामजी जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पटेल ट्रक (एमएच 04 जे यु 0245) चालविण्याचे काम करतात. बुधवारी रात्री ते देहूरोड – कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात होते. बावधनमधील सुतारवाडीच्या नवीन पुलाजवळ आले असता दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी पटेल यांच्या ट्रकवरील क्लिनर पिंटू हिरालाल सिंग (वय 18) यास बांबूने मारले. तसेच पटेल यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी पटेल यांच्याकडून 10 हजार 500 रुपयांची रोकड आणि 1 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

दुस-या घटनेत समाधान भास्कर वाघ (वय 29, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघ बुधवारी रात्री सेंट उर्सुला शाळेच्या बाजूने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्याकडे असलेला 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत निगडे करून सांगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.