Hinjawadi : हिंजवडी पंचक्रोशीत आज विसर्जन

72 मंडळांच्या बाप्पाचे होणार विसर्जन

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील गणेशोत्सवाची आज (बुधवारी, दि. 27) सांगता (Hinjawadi) होणार आहे. मिरवणूक काढून ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर नाचून गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी मंडळांसह प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
हिंजवडी परिसरातील हिंजवडी, माण, मारुंजी, कासारसाई या पंचक्रोशीत 72 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. या मंडळांकडून नवव्या दिवशी म्हणजेच आज गणेश विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. आयटी पार्क असलेल्या हिंजवडी मधील विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

Maval : इंदोरी येथे प्रा. विजया मारोतकर यांचे व्याख्यान संपन्न
मंडळांनी सकाळपासून विसर्जन रथाची सजावट सुरु केली आहे. विसर्जन रथावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट करून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रत्येक मंडळांमध्ये चढाओढ लागलेली असते. घरगुती गणपतीचे देखील आज विसर्जन केले जाते. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी घाटांवर मूर्तीदान, निर्माल्य संकलन असे उपक्रम राबवले जाणार आहेत. कृत्रिम विसर्जन हौद बांधून त्यात विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचा वसा पाळण्यात येणार आहे.
मंडळांसह पोलीस प्रशासन देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले (Hinjawadi) आहे. हिंजवडी येथील विसर्जन सोहळ्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून एक राखीव पोलिसांची तुकडी, अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रशासनाला सहकार्य करा
सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे म्हणाले, “गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून आनंदात गणपती बाप्पाला निरोप द्यावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
डीजेला 12 पर्यंत परवानगी
विसर्जनाच्या नवव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आज (बुधवारी, दि. 27) रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक वाजतील. त्यानंतर मात्र मंडळांना आपल्या डीजेला म्युट करावे (Hinjawadi) लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.