Hinjawadi : गणेश विसर्जनानिमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हिंजवडी पंचक्रोशीतील गणपती ( Hinjawadi) विसर्जन आज (बुधवार, दि. 27) होणार आहे. घरगुती बाप्पासह मंडळांच्या बाप्पाला देखील ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत आज निरोप दिला जाणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. आज दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल असणार आहेत.

बंद मार्ग – टाटा टी जंक्शन चौक – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रीकल सर्कल व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – टाटा टी जंक्शन चौकाकडून लक्ष्मी चौक मार्गे.

बंद मार्ग – जॉमेट्रीकल सर्कल चौक – जॉमेट्रीकल सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – टाटा टी जंक्शन चौक-लक्ष्मी चौक मार्गे.

Hinjawadi : हिंजवडी पंचक्रोशीत आज विसर्जन

बंद मार्ग – मेझा 9 चौक – मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – लक्ष्मी चौक मार्गे.

बंद मार्ग – शिवाजी चौक – शिवाजी चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – शिवाजी चौक-विप्रो सर्कल फेज एक चौक-जॉमेट्रीकल सर्कल-टाटा टी जंक्शन मार्गे.

बंद मार्ग – कस्तुरी चौक – कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे ( Hinjawadi) जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – विनोदे वस्ती कॉर्नर-लक्ष्मी चौक मार्गे.

बंद मार्ग – जांभूळकर जिम चौक – शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – इंडियन ऑईल चौक-कस्तुरी चौक-विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.

बंद मार्ग – इंडियन ऑईल चौक – जांभूळकर जिम व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – कस्तुरी चौकातून विनोदे वस्ती ( Hinjawadi) कॉर्नर मार्गे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.