Maval : इंदोरी येथे प्रा. विजया मारोतकर यांचे व्याख्यान संपन्न

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. विजया मारोतकर नागपूर (Maval ) यांनी विद्यार्थ्यांना ‘जरा जपून चाल पोरी’ या आशयावर प्रबोधन प्रगती विद्या मंदिर व ह. भ. प. आ.ना काशिद पाटील ज्यूनिअर काॅलेज इंदोरी येथे केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सरस्वती प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. राहूल खळदे,रो. संदिप मगर, रो. योगेश शिंदे, प्राचार्य कैलास पारधी, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे,शिक्षक प्रतिनिधी सौ. मोहिनी ढोरे सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर,सौ. अश्विनी शेलार,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सौ. श्वेता मोहिते, शिक्षकेतर प्रतिनिधी गुलाब ढोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. विजया मारोतकर म्हणाल्या की, कुटुंब व्यवस्थेत भाऊ बहिणीचे (Maval ) नात्यांचे मोल स्पष्ट केले. तसेच मोबाईल काळाची गरज असली तरी त्याचा योग्य वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. मुलींनी नेहमी सतर्क राहून प्रत्येक पाऊल जपून उचलावे असा मोलाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रो राहूल खळदे यांनी मार्गदर्शन केले. तिन्ही संस्थाचै मार्गदर्शक श्री . संतोषजी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आगळावेगळा पोरी जरा जपून कार्याचे कार्यावलोकन असा उपक्रम तळेगाव दाभाडे व परिसरात सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे सर्व परिसरात कौतुक होत आहे.
कार्यक्रमास अनेक महिला पालक व 8 वी ते 12 वी पर्यंतच्या 200 विद्यार्यांनी सहभागी झाल्या होत्या.  प्रास्ताविक सौ. अश्विनी शेलार यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय दिलीप पोटे यांनी करून दिला. आभारप्रदर्शन प्राचार्य कैलास पारधी यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी मोहिनी ढोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर (Maval ) कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.