Hinjawadi : तरुणीशी असभ्य वर्तन करणा-या हॉटेल मालकाकडून ग्राहकांना मारहाण

एमपीसी न्यूज – 31 डिसेंबरला पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुणीशी हॉटेल मालकाने आणि त्याच्या मित्रांनी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 1) पहाटे बाराच्या सुमारास सुसगाव येथे घडली.

वैभव मधुकर प्रभाकर (वय 23, रा. औंधरोड, स्नेहल अपार्ट, खडकी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कबीला हॉटेल चा मालक चांदेरे, त्याचा मित्र पप्पू व सौरभ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत 31 डिसेंबरला रात्री पार्टी करण्यासाठी सुसगाव येथील कबीला हॉटेलमध्ये आले होते. पहाटे 12 च्या सुमारास काही अनोळखी इसमांनी वैभव यांचा मित्र इमाद यांच्या मैत्रिणीला जाणीवपूर्वक धक्का मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी वैभव गेले. त्यावेळी हॉटेल मालक चांदेरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून वैभव यांना बांबूने, कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी पंचने मारले. यामध्ये वैभव जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.