Pune : मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- मोबाईलवर गेम खेळण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 31) धनकवडी येथे घडली. आईने त्याला अभ्यासाला बस असे सांगितले़ मात्र अभ्यास न करता मुलगा मोबाइलवर गेम खेळत असल्याचे पाहून आईने त्याला मोबाइल बाजूला ठेवून अभ्यास करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अथर्व मनीष भुतडा (वय 13 रा. गणेश सिद्धी सोसायटी, गणेशनगर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा सरहद स्कूल मध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. त्याला मोबाइलवर गेम खेळण्याचे वेड होते. मोबाइल न वापरण्याबाबत त्याचे पालक त्याला वारंवार सांगत असत.

सोमवारी(दि. 31) दुपारी अथर्वच्या आईने मोबाइल बाजूला ठेवून अभ्यास करण्यास अथर्वला सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्यानंतर तो नेहमीप्रमाणे आपल्या खोलीमध्ये अभ्यास करण्यास गेला. मात्र संध्याकाळी साडेसहा वाजून गेल्यानंतरही अथर्व खोलीबाहेर न आल्यामुळे पालकांनी बराच वेळ खोलीचे दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून खोलीचा दरवाजा तोडला असता अथर्वने गळफास घेल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.