BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : ऍमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाउचरच्या बहाण्याने तरुणाला दीड लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – ऍमेझॉन कंपनीचे गिफ्ट व्हाउचरमध्ये निवड झाली असल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळ्या वस्तूंचे आमिष दाखवून तरुणाची 1 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2018 मध्ये हिंजवडी येथे घडला.

रजत बैकुंट गुप्ता (वय 24, रा. हिंजवडी. मूळ रा. नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर 2018 रोजी रजत यांना त्यांच्या मोबाईल फोनवर ऍमेझॉन कंपनीचे गिफ्ट व्हाउचर मिळाले असल्याचा मेसेज आला. त्याद्वारे आरोपीने डेल कंपनीचा लॅपटॉप, सोनी स्मार्ट टीव्ही, एलजी कंपनीचा फ्रिज, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन व सॅमसंग एसी यापैकी एक वस्तू निवडता येईल असे सांगितले. त्यानुसार रजत यांनी अॅपल कंपनीचा मोबाईल फोन निवडला. त्यानंतर ऍमेझॉनकडे दुसरी एखादी ऑर्डर करा, म्हणजे त्या ऑर्डर सोबत त्यांच्या गिफ्ट व्हाउचरमध्ये लागलेली वस्तू त्यांना पाठवता येईल, असेही सांगितले. त्यानुसार रजत यांनी 6 हजार 423 रुपयांची दुसरी ऑर्डर केली.

ऑर्डर दिल्यानंतर आरोपीने कोणतीही वस्तू दिली नाही. वेळोवेळी पैसे परत करण्याचा बहाणा करून रजत यांच्याकडून वेळोवेळी कर्नाटक बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँक खात्यावर एकूण 1 लाख 46 हजार 434 रुपये भरण्यास सांगितले. पैसे मिळून देखील आरोपीने मोबाईल फोन अथवा पैसे न देता रजत यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3