BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – नेरेदत्तवाडी येथे एक सुपर मार्केट दुकान फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

मोहन धनाराम चौधरी (वय 34, रा. नेरेदत्तवाडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन यांचे दत्तवाडी चौकात भवानी सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उकडीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.