Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी, कारसह पळविताहेत मालवाहतूक टेम्पो!; पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

निगडीत सायकल चोरीचा गुन्हा नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दुचाकी, चारचाकी याबरोबरच मालवाहतूक टेम्पो देखील चोरटे चोरून नेत आहेत. चोरट्यांनी घातलेल्या या धुमाकुळामुळे पोलीस यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. पोलिसांना चोरट्यांचा तपास लागत नाही. निगडी येथे एक सायकल देखील चोरीला गेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी भागात गणराज हॉटेल समोर असलेल्या किराणा दुकानासमोर लावलेली एक दुचाकी (एमएच 14 / ए वाय 8911) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास घडली. लहानू हरिभाऊ आंग्रे (वय 29) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. लहानू किराणा मालाच्या दुकानात माल घेत असताना त्यांची दुचाकी लॉक करून दुकानासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी हॅण्डललॉक तोडून दुचाकी पळवली.

  • चिंचवड पोलीस ठाण्यात रियाज शौकत शेख (वय 36) यांनी फिर्याद दिली. त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची इंडिका विस्टा कार (एमएच 12 / केएन 4575) चोरट्यांनी बनावट चवीच्या साहाय्याने चोरून नेली. ही घटना 12 जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास गुरुद्वारा चौकाजवळ उघडकीस आली.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अॅव्हेंजर दुचाकी (एमएच 12/ पीके 2592) लॉक व पार्क करून ठेवलेली होती. चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी पळवली. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी दहाच्या सुमारास मारुंजी येथे उघडीस आली.

  • निगडीमध्ये एक सायकल चोरीचा प्रकार समोर आला आहे. यमुनानगर निगडी येथे सेक्टर नंबर 21 मधून चोरट्यांनी करड्या रंगाची 21 गिअर असलेली 12 हजार रुपये किमतीची सायकल चोरून नेली. फुगेटिव्ह कंपनीची सायकल असून तिचा फ्रेम नंबर डी वाय 180600666 असा आहे. विनायक केरबाजीराव घोडके (वय 38) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वाकड येथे डांगे चौकातून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मालवाहतूक टेम्पो चोरट्यांनी चोरून नेला. मोहन महादेव चव्हाण (वय 43) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोहन यांनी त्यांचा टेम्पो लॉक करून पार्क केला असता शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 21) पहाटे उघडकीस आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.