Hinjwadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


एमपीसी न्यूज –  दुचाकीवरुन घरी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली.

अमोल उद्धव टाके (वय 30 रा. वडगाव बुद्रूक) असे मृत तरुणाचे नाव असून कैलास कदम (वय 27 उत्तमनगर, पुणे) यांनी हिंजवडी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाके हे कदम यांचे मेहुणे असून ते रात्री दुचाकीवरुन घरी जात असताना भऱधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये टाके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.