Pimpri Crime News : लग्नाचे आश्वासन देऊन परराज्यात नेऊन एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने महिलेसोबत ठेवले लैंगिक संबंध

एमपीसी न्यूज – महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिला पिंपरी, देहूरोड, गोवा आणि तिरुपती बालाजी येथे नेऊन एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने वेळोवेळी महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले. तसेच महिलेने कुठेही तक्रार करू नये म्हणून महिलेला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला.

संतोष शंकर गोरे (वय 51, रा. आळंदी), अनिल दिनकर शिंदे (वय 62, रा. नारायणगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने 8 नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याने पीडित महिलेला लग्नाचे आश्वासन दिले. महिलेला पिंपरी, देहूरोड, गोवा आणि तिरुपती बालाजी येथे नेऊन तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. महिलेकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण व शिवीगाळ केली.

आरोपी संतोष याला एचआयव्ही सारखा आजार असताना त्याने ही बाब फिर्यादी महिलेपासून लपवून ठेऊन तिच्या जीवितास धोका निर्माण करून तिची फसवणूक केली. आरोपी अनिल शिंदे याने पीडित महिलेने कुठेही तक्रार करू नये यासाठी तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.