ICC WC 2019 : धोनी रन आऊट झाला आणि भारताचं‌ विश्र्वचषकाच स्वप्न भंगले

Dhoni was run out and India's World Cup dream was shattered

एमपीसी न्यूज – विश्र्वचषक 2019 ची सेमीफायनलचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गेल्यावर्षी 9 जुलै रोजी खेळवला गेला होता. मात्र पावसामुळे सतत व्यत्यय आल्याने सामना 10 जुलैला रिझर्व्ह डेला खेळवला गेला होता. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर घेण्यात आलेल्या या सामन्यात कोट्यवधी भारतीयांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न महेंद्रसिंह धोनीच्या एका रनआऊटमुळे भंगलं होतं.

मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर 10 जुलैला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 239 धावा केल्या. यानंतर 240 धावांचा पाठलाग करायला आलेली टीम इंडिया 49.3 ओव्हरमध्ये 221 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.

एक वर्ष पूर्ण झालं म्हणून आयसीसी ने  एक व्हिडीओ इन्स्टाग्राम व ट्वीटर वर शेअर केला आहे. धोनीचं रनआऊट होणं हा या सेमीफायनल सामन्यातील गेम चेजिंग क्षण होता. व्हिडीओ पाहून भारतीय फॅन्सनी अनेक इमोशनल कमेन्ट केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनी कसा रनआऊन झाला हे दाखवण्यात आलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

रविंद्र जाडेजाने या ऐतिहासिक सामन्याला एक पूर्ण झाल्या निमित्त भावनिक पोस्ट टाकली आहे. ‘आम्ही खूप प्रयत्न केला, तरीही कमी पडलो. आयुष्यातील एक दुखःद दिवस’ असं संदेश लिहून जडेजाने फोटो पोस्ट केला आहे.

या सामन्यात रविंद्र जाडेजाने 77 धावा तर धोनीने 50 धावा केल्या होत्या. जाडेजासोबत भागीदारी करत धोनीने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आणलं होतं. मात्र धोनी रनआऊट झाला आणि भारताचा विजय हातून निसटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.