Sangvi : ‘डेटींग अ‍ॅप’वर ओळख, लग्नाच्या आमिषाने तरुणीची लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – डेटींग अ‍ॅपवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तरूणीकडून गुगल पे व्दारे 93 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच तिचा अश्लील व्हिडीओे बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली, तरुणीला शिवीगाळ केली. हा प्रकार पिंपळे-सौदागर येथे नुकताच घडला.

याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहील प्रमोद आरोरा (रा. हुशीयारपुरा, जालंदर, पंजाब) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी साहील यांची डेटींग अ‍ॅपवरून ओळख झाली. फिर्यादीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तिचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून गुगल पे व्दारे 93 हजार रूपये घेऊन फसवणूक केली. तसेच तिला शिवीगाळ केली. सांगवी ठाण्याचे फौजदार जी. डी. माने तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.