India Corona Update: मागील 24 तासांत 14,933 नवे रुग्ण, 312 जणांचा मृत्यू; मृत्यूने ओलांडला 14 हजारांचा टप्पा

India Corona Update: 14,933 new cases, 312 deaths in last 24 hours; Death crossed the 14 thousand mark महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण असून, आजवर 1,35,796 रुग्ण आढळून आले आहेत पैकी 67,706 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर, 61,807 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 14,933 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या 4,40,215 वर जाऊन पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14,011 एवढी झाली आहे.

देशात रविवारी (दि.21) रोजी सर्वात उचांकी 15 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली होती, त्यांनतर हा दुसरी सर्वांत मोठी रुग्ण वाढ आहे. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील मोठे असून आजवर 2,48,190 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1,78,014 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण असून, आजवर 1,35,796 रुग्ण आढळून आले आहेत पैकी 67,706 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर, 61,807 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात 6,283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 62,655 रुग्नांची नोंद करण्यात आली असून 2,233 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूमध्ये आजवर 62,087 रुग्ण आढळले आहेत. तर 794 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, दिल्लीसह कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. 723 सरकारी आणि 262 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या जात असून गेल्या 24 तासांमध्ये दीड लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.