India News : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरची ऑस्करमध्ये नवे सदस्य म्हणून निवड

एमपीसी न्यूज – आरआरआर निर्मात्यांसाठी अजून (India News ) एक अभिमानाचा क्षण आला आहे.  काही महिन्यांपूर्वी जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळवला आणि आजही जग ‘नाटू नाटू’ आवडीने ऐकत आहेत.

ऑस्कर अकादमीने 398 नवीन सदस्यांना आपल्या रँकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये आरआरआर स्टार्स राम चरण आणि ज्युनियर एनटीआर देखील या यादीत आहेत. या यादीमध्ये जगप्रसिद्ध कलाकार जसे की टेलर स्विफ्ट, ऑस्टिन बटलर, के हुआ क्वान, द डॅनियल आणि इतरांचा समावेश आहे.

Bhosari : अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवरून बदनामी; दोघांवर गुन्हा

एमएम कीरावानी, चंद्रबोस, के के सेंथिल कुमार आणि साबू सिरिल हे देखील अकादमीचे नवीन सदस्य बनले आहेत. दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम, व्हीएफएक्स कलाकार सनथ हरेश (India News) आणि हिंगोराणी हे देखील अकादमीमध्ये सामील झाले आहेत.

आरआरआर संघासाठी ही खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आहे. ऑस्करमध्ये सामील झालेल्या स्टार कलाकार आणि तंत्रज्ञांना नेटकरी यांच्याकडून अभिनंदन मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.