Bhosari : अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवरून बदनामी; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीचे नाव (Bhosari) व फोटो वापरून बनावट इन्स्टा अकाऊंट तयार करत त्याद्वारे महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार 26 जून ते 28 जून दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.28) फिर्याद दिली असून राघू सोनावणे आदित्य (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून आरोपींनी फिर्यादीच्या मित्र-मैत्रिणींना अश्लील मॅसेज पाठवत त्यांची बदनामी केली आहे. हा सारा प्रकार इन्स्टा खात्यावरून सुरु होता.

त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर (Bhosari) पोक्सो व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याच गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Wakad : सोसायटीमध्ये पार्क केलेली सात वाहने अज्ञाताने जाळली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.