PCMC : दोनवेळा बक्षीसाची रक्कम मिळालेल्या 57 विद्यार्थ्यांचा मिळेना प्रतिसाद, पालिकेचे अडकले 6 लाख

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास (PCMC) विभागाने दहावी व बारावीतील 250 गुणवंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 10 हजारांऐवजी दुप्पट 20 हजार रुपये जमा केले होते. 250 पैकी 57 विद्यार्थ्यांनी अद्यापही महापालिकेला परत पैसे दिले नाहीत. त्यांच्याकडे 5 लाख 70 हजार रुपये अडकले आहेत. दरम्यान, दहावी, बारावीच्या 4 हजार 593 गुणवंत विद्यार्थ्यांना 10 कोटी 14 लाख रुपयांचे बक्षीस दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविली जाते. दहावी व बारावीमध्ये मध्ये 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजार तर, 80 ते 90 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जातात.

यासाठी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांकडून गुणपत्रिका, आधारकार्ड, शहरात वास्तव्यास असल्याचा पुरावा, बँक खात्याची माहिती घेतली जाते.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी बँकेकडे दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, 250 विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये दोनदा पाठविण्यात आले. दोनदा पैसे गेल्यानंतर ही रक्कम परत मिळविण्यासाठी समाज विकास विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना मोबाइलवर संदेश पाठवत जास्तीची रक्कम परत पाठविण्याची विनंती केली.

India News : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरची ऑस्करमध्ये नवे सदस्य म्हणून निवड

250 पैकी 193 विद्यार्थ्यांनी दोनवेळा आलेले पैसे परत केले. पण, 53 विद्यार्थ्यांनी (PCMC) अद्यापही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्याकडे 5 लाख 70 हजार रुपये अडकले आहेत.

याबाबत समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर म्हणाले, दोनवेळा बक्षीस मिळालेल्या 53 विद्यार्थ्यांकडून 5 लाख 70 हजार रुपये येणे शिल्लक आहे. मागील शैक्षणिक वर्षातील दहावी, बारावीच्या 4 हजार 593 गुणवंत विद्यार्थ्यांना 10 कोटी 14 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. एकही विद्यार्थी बक्षीस देण्याचा राहिलेला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.