Talegaon Dabhade  : इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचा कवी केशवसुत पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमी तसेच कवी केशवसुत स्मारक समिती यांच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना कवी केशवसुत काव्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. (Talegaon Dabhade) कवी केशवसुत यांच्या जन्म गावी मालगुंड जि. रत्नागिरी येथे झालेल्या सोहळ्यात पुरस्कार देऊन मलघे यांना सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे, पिंपरी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कवी केशवसुत काव्य पुरस्कार डॉ.मलघे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले की, समकालीन वर्तमानाला कवेत घेणारी आणि सामाजिक भान भक्कमपणे प्रकट करणारी मलघे यांची कविता मराठी कवितेत नवे आयाम निर्माण करणारी आहे.अस्वस्थ भवताल आणि वेदनांचे चेहरे या कवितासंग्रहाची आज दखल घेतली जात आहे.आजच्या समाजातील अस्वस्थ वेदना त्यांच्या कवितेतून मुखर होत आहेत. चिंतनशील असणारी त्यांची कविता नक्कीच आशादायी आहे.

Talegaon Dabhade : स्तनाचा कर्करोग औषध संशोधनात फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अमर्याद संधी – डॉ. भीमाशंकर उटगे

याप्रसंगी डॉ. सबनीस यांनी मलघे यांच्या चिंधी या (Talegoan Dabhade) कवितेविषयी बोलताना सांगितले की, एका ऊस तोडणी करणाऱ्या स्त्रीच्या असणारी व्यथा वेदना वास्तवपणे या कवितेत टिपल्या आहेत. तिचे दुःख,संघर्ष मांडताना ही कविता उंचीवर जाते.

 

पोटाच्या आगीसाठी

फड तोडिते उसाचा

चोळी शिवून घालते

डोंब पेटला भुकेचा

 

सारा उघडा हा संसार

किती पाचोळ्यांनं झाकू

अंग निघालं सोलून

कसं घामाला मी विकू

मलघे यांचा काव्यप्रवास उलगडताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले . भविष्यात त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे डॉ.सबनीस यांनी याप्रसंगी सांगून त्यांचे अभिनंदन केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मलघे म्हणाले की, मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्यकला अकादमी यांच्यावतीने,कवीश्रेष्ठ केशवसुत काव्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले ही खरंतर अतिशय आनंदाची व अभिमानाची घटना आहे. (Talegaon Dabhade) नारायण सुर्वे हे कवितेचे आद्य दैवत आहे आणि ज्या केशवसुतांनी मराठी कवितेची नवी पायवाट सुरू केली,आधुनिक कवितेचे जनक म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा महान कवीच्या नावाने हा पुरस्कार स्वीकारताना मन भरून आले आहे.

याप्रसंगी त्यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची प्रचंड दाद मिळवली.

डॉ.मलघे यांनी आजपर्यंत कथा, कविता,कादंबरी,समीक्षा,ललित बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात सुमारे २२ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी तसेच मावळ मधील जनतेने, विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.