Talegaon Dabhade : स्तनाचा कर्करोग औषध संशोधनात फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अमर्याद संधी – डॉ. भीमाशंकर उटगे

एमपीसी न्यूज – स्तनाच्या कर्करोगाने स्रियांना विळखा घातला असून या कर्करोगावर प्रभावी औषध संशोधनाच्या अमर्याद संधी औषधनिर्माण शास्त्राच्या पदवी धारकांना उपलब्ध असल्याचे मत राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणेचे तांत्रिक अधिकारी डॉ. भीमाशंकर उटगे यांनी मांडले.(Talegaon Dabhade) ते तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलत होते.

इंद्रायणी बी. फार्मसी महाविद्यालय व राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात डॉ. उटगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश म्हस्के यांनी केले.

डॉ. उटगे यांनी विद्यार्थ्यांना कर्करोग लक्षणे व त्यावरील उपचारपद्धती या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आजच्या युगातील स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उतरण्याचे आवाहन केले. (Talegaon Dabhade) तसेच त्यांनी कर्करोगाचे होणारे जनुकीय बदल यावरही प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना प्रिमोव्हर्ट इन्व्हर्टेड मायक्रोस्कोपद्वारे जगातील पहिल्या कर्कपेशीचे प्रात्यक्षिकासह कोरोनाकाळातील को व्हॅक्सिन साठी वापरण्यात आलेल्या ‘मंकी किडनी सेल’चेही मायक्रोस्कोपद्वारे परीक्षण त्यांनी करून दाखवले.

Pune News : प्रियकरानेच पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा केला खून, आत्महत्येचा केला बनाव

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. साक्षी जगदाळे हिने तर आभार कल्याणी कोकणे हिने मानले. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा. कादंबरी घाटपांडे, प्रा. श्याम आवटे यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, विश्वस्त निरुपा कानिटकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.