Pune News : प्रियकरानेच पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा केला खून, आत्महत्येचा केला बनाव

एमपीसी न्यूज – प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा (Pune News) गळा दाबून खून करत आत्महत्येचा बनाव केला होता. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर येथे शुक्रवारी (दि.24) घडली आहे.

याप्रकरणी प्रियकर व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. तर मयत महिलेचे नाव हे फातीमाबी शेख असे आहे.

Chinchwad Bye-Election :  मतदानाला उरले तीन तास, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.55 टक्के मतदान

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, आरोपी याची मयतही प्रेयसी होती. मात्र संसारात तिचा अडथळा निर्माण झाल्याने आरोपीने गळा दाबून व मारहाण करत तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी फातीमा बी हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत ठेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. (Pune News) तसेच उपचारासाठी नेत महिलेने गळफास घेतल्याचे ससून हॉस्पीटलमध्ये जाऊन सांगत दिशाभूल केली. मात्र पोलिसांना तपासात आरोपीने खून केल्याचे उघड झाले त्यानुसार आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.