Talegaon Dabhade News : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत लेखणी बंद आंदोलनास इंद्रायणी महाविद्यालयाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – राज्यभर सुरु असलेल्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आंदोलनाला तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या आंदोलनाला महाविद्यालयाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

अध्यक्ष रामदास काकडे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मलघे यांनी काम बंद आंदोलनास भेट दिली. त्यावेळी बोलताना काकडे म्हणाले, “तुमच्या मागण्या रास्त आहेत. तुमच्या मागण्यांसाठी आंदोलन केलेच पाहिजे. हे आंदोलन राज्यव्यापी असल्याने तुमच्या मागण्यांबाबत शासनाला जागे करण्याचे काम करा. शिक्षकेतर कर्मचा-यांना काही अडचणी असतील तर शासन दरबारी येऊन त्या सोडवून देण्याचे आश्वासन देखील काकडे यांनी शिक्षकेतर कर्मचा-यांना दिले. काकडे यांनी आंदोलक कर्मचा-याना चहापान व नाष्ट्याबाबत विचारपूस केली.

यावेळी कामगार प्रतिनिधी सुबोध गरुड, नामदेव ढोरे, सुरेखा तरटे, शैलजा ढोरे, प्रतिभा जाधव, किशोर डामसे, रवींद्र बिक्कड, किशोर शेवकर, संतोष शिरसाट, राजेंद्र जवरे, कैलास भुजबळ, हेमंत हळवे, समीर जांभुळकर, अमित गायकवाड, विजय मावळकर, सतीश लोखंडे, तुकाराम राठोड, राजेंद्र पांडवर, अमोल खैरे, अनिल गवळी, अनुराधा पंधारे, गणेश पोरे, प्रसाद डुंबरे, बाळासाहेब बाराथे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.18) राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाची हाक दिली. याला प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करत आहेत. सातवा वेतन आयोग लागू करणे, पगारातील फरक मिळणे यांसह 27 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या राज्यव्यापी आंदोलनामध्ये एकूण 27 मागण्या करण्यात आल्या होत्या त्यामधील प्रमुख मागण्या या पुढील प्रमाणे-

सातव्या वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी अदा करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 10, 20 आणि 30 वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी,सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा आठवडा करावा, तीन लाभांची योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी. अकृषी विद्यापीठांमधील उर्वरित 796 पदांचा सातवा वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचनेचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, समान काम समान वेतन हे धोरण लागू करावे.

कामाचा ताण वाढत आहेत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्कृत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून महाविद्यालयातील पदभरती त्वरीत करावी.महाविद्यालयातील शिक्षकेत्तर पदांचा नव्याने आकृतिबंध सुधारित करणे.

एकाकी पदे भरण्यास परवानगी द्यावी. सद्या महाविद्यालयातील कार्यालयातील प्रमुख पदे प्रबंधक, अधीक्षक, मुख्य लिपीक आदि पदे रिक्त आहेत वरच्या महाविद्यालयातील सदरच्या पदावर पदोन्नती कर्मचारी उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी कार्यालयातील महत्वाची पदे भरणे आवश्यक आहेत तरी एकाकी पद भरती तात्काळ सुरू करावी. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना प्रमाण संहिता 1984 नियम दुरुस्ती करून तातडीने लागु करणे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना विद्यापीठाच्या विविध समितीवर प्रतिनिधीत्व मिळवणेबाबत व त्यानुसार विद्यापीठ कायदा 2016 मध्ये दुरूस्ती होण्याबाबत नैमितक रजेचे लाभ मिळावा महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमाण संहिता 1984 मधील 4 मधील 28 मध्ये तरतूद केले प्रमाणे नैमित्तिक रजेचा लाभ सर्वत्र समान मिळावा. अर्जित रजा ह्या सेवानिवृत्ती पर्यंत गणण्यात याव्यात याप्रमाणे अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.