Pimpri : उद्यान देखभालीच्या ‘रिंग’ची चौकशी करु – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय, विविध उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेल्या निविदेत ‘रिंग’ झाल्याची तक्रार आली असेल. त्यामध्ये रिंग झाली असेल तर चौकशी केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्यान विभागाने  देखभाल दुरुस्तीच्या 14 विविध कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. 23 सप्टेंबर 2019 रोजी सादर केल्यावर तब्बल चार महिन्यानंतर निविदा प्रशासनाने उघडली. त्यापैकी पाच कोटी 97 लाख रुपयांच्या पाच निविदांमध्ये गडबड घोटाळा झाला आहे. तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा एकाचदिवशी घाईगडबडीत उघडण्यात आले. त्यामध्ये भोसरी सहल केंद्रातील उद्यानाच्या एक कोटी 85 लाख आणि भोसरी प्राधिकरण पेठ क्रमांक सात येथील एक कोटी 28 लाख या कामात ‘रिंग’ झाल्याचे स्पष्ट दिसून येते. तर, तीन निविदांमध्ये अपात्र ठेकेदाराला कंत्राट देण्याची घाईगडबड महापालिका प्रशासनाने केल्याचा आरोप करत या निविदा त्वरित रद्द कराव्यात आणि फेरनिविदा काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती.

याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. यावर बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, उद्यान विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेल्या निविदेत ‘रिंग’ झाल्याची तक्रार आली असेल. त्यामध्ये रिंग झाली असेल. तर, चौकशी केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.