IPL 2020 : आयपीएलच्या तेराव्या हंगामातील जाणून घ्या काही महत्वाचे बदल

कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे.

एमपीसी न्यूज – अखेर आयपीएलची (IPL 2020) तारीख निश्चित झाली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. यंदाचा हंगाम 53 दिवस चालणार आहे. याआगोदर फायनल सामना 8 नोव्हेंबरला खेळवला जाणार होता.
बीसीसीआयने 20 ऑगस्टआधी कोणताही संघ युएईला रवाना होणार नाही अशी सूचना संघमालकांना दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे.
  • या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.
  • आयपीएलचे आयोजन युएइच्या अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये होणार आहे.
  • बीसीसीआय यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. लवकरच सर्व खेळाडूंना ही नियमावली पाठवण्यात येणार असून खेळाडूंना तिचे पालन बंधनकारक असणार आहे.
  • खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएईला जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएईमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.
  • आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
  • भारतीय वेळेनुसार प्रत्येक सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल तर तसेच, ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे.
  • आयपीएलचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. स्टारच्या सर्व चॅनलवर आणि हॉटस्टारवर हा सामना पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.