IPL 2023 – हाय स्कोरिंग थ्रिलर मध्ये चेन्नईने बाजी मारली ; धोनी सीएसके गोलंदाजांवर नाराज

एमपीसी न्यूज – सोमवारी दिनांक 3 एप्रिल रोजी चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे(IPL 2023) झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स ने लखनऊ सुपर जायंट्स यांना बारा धावांनी हरवले. हा सामना हाय स्कोरिंग म्हणजे जास्त धावसंख्या असलेला होता. दोन्हीही संघाने स्वतःच्या 20 षटकांमध्ये 200 चा आकडा पार पाडला. इतर वेळेला असणारी चेपॉकची पीच जी कायम फिरकी गोलंदाजांना सहाय्य करते ती काल पूर्णपणे सपाट असून हाय स्कोरिंग गेम झाला. नाणेफेक जिंकून एलएसजी ने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

चेन्नई सुपर किंग्स चे सलामी जोडी यांनी संघाला उत्तम सुरुवात दिली. ऋतुराज गायकवाड (57) आणि देवान कॉन्वे (47) यांनी लखनऊच्या गोलंदाजांना ना पूर्ण स्टेडियम भर मारले. जेव्हा ते दोघे फलंदाजी करत होते तेव्हा चेन्नई निवांत 230 चा आकडा गाठेल असे वाटत होते. परंतु ऋतुराज आणि कॉन्वे आऊट झाल्यावर चेन्नईची धाव गती कमी झाली. त्यांच्यानंतर आलेल्या शिवम दुबे(27), मोईन आली (19) आणि अंबाती रायडू (27) यांच्या कॅमिओमुळे चेन्नईला परत चांगली धाव गती मिळायला चालू झाली. शेवटच्या षटकात फलंदाजी करायला आलेला कर्णधार एम एस धोनी यांनी 3 चेंडू मध्ये 12 धावा काढून चेपॉकच्या समर्थकांचे पैसे वसूल केले आणि संघाला 217 अशा आवडव्य धावसंख्येपर्यंत पोहोचवले. लखनऊ कडून गोलंदाजी करताना मार्क वूड आणि रवी बिश्नोई या दोघांनीही तीन बळी बाद केले. तर आवेश खानने एक बळी बाद केला.

217 या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स च्या सलामी फलंदाजाने संघाला उत्कृष्ट सुरुवात दिली. कर्णधार के एल राहुल (20) आणि काईल मायर्स (53) या दोघांनी पावर प्ले षटकांचा पुरेपूर उपयोग केला. चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांना त्यांनी एवढे तुडवले की एकेकाही वाटत होते की एलएसजी हा सामना दोन-तीन षतक राखून मारेल. परंतु कर्णधार एम एस धोनीने फिरकी गोलंदाजांना आणल्यावर एलएसजी ची पडती लागली. निकोलस पुरण (32), मार्कस स्टाइनीस (21) , आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला आयुष्य बडोनी (23) यांच्या योगदानामुळे लखनऊ ची टीम ही धावसंख्येच्या जरा जवळ गेली. चेन्नई कडून मोईन अली ने उत्तम गोलंदाजी करत चार बळी घेतले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या तुषार देशपांडे यांनी दोन तर न्यूझीलंड फिरकी गोलंदाज मिचेल सेंटनर याने एक बळी घेतला. चेन्नईच्या गोलंदाजाने भरपूर गरज नसताना अतिरिक्त धावा दिल्या.

 

आयपीएल 2023 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक धावा असल्याने ऋतुराज गायकवाडला ऑरेंज कॅप देण्यात आली. सामना संपल्यावर पोस्टमॅच परिषदेमध्ये कर्णधार एम एस धोनीने गोलंदाजांना चेतावणी दीली. “त्यांना नो-बॉल आणि कमी वाइड्स टाकावे लागतील. आम्ही खूप जास्त चेंडू टाकत आहोत आणि त्यांना कमी करणे आवश्यक आहे अन्यथा ते एका नवीन कर्णधाराखाली खेळतील,” असे धोनी म्हणाला. अवघ्या चार वर्षानंतर चेन्नई स्वतःच्या घरेलू मैदानावर खेळू शकली. चेन्नई जिंकल्यामुळे त्यांचे समर्थक हे (IPL 2023) भरपूर खुश झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.