IPL 2023 : शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचा दमदार विजय

एमपीसी न्यूज – गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 31 मार्च शुक्रवार रोजी (IPL 2023) पाच बळी राखून हरविले. गुजरातच्या घरी नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या मॅच मध्ये भारताचे दोन तरुण फलंदाज शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची उत्तम कामगिरी झाली. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच शंका नंतर सी एस के चा कर्णधार एम एस धोनी हा खेळतो का नाही असा प्रश्न होता. परंतु नाणेफेक च्या वेळी आल्याने हे कळाले की तो संपूर्ण सामना खेळेल.

 

 

पहिली फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स चा देवान कॉन्वे (1) हा स्वस्तातच उडाला. परंतु त्याचा सलामी वीर जोडीदार ऋतुराज गायकवाड उत्तम कामगिरी 92 धावा काढल्या. मोहीम आली (23), बेन स्टोक्स (7), अंबाती रायडू (12), रवींद्र जडेजा (1), शिवम दुबे (19) यांचे थोडे थोडे योगदान होते. कर्णधार धोनीने शेवटच्या षटकात एक षटकार आणि चौकार मारून चेन्नईला 178 पर्यंत पोहोचवले. गुजरात कडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले.  सी एस के च्या फलंदाजीच्या वेळी गुजरात टायटन्सचा मुख्य फलंदाज केन विल्यम्सन याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. पुढचे रिपोर्टच तो किती वेळ बाहेर असेल हे सांगतील. सुरुवातीच्या आणि मधल्या षटकांमध्ये चेन्नईने चांगली फलंदाजी केली परंतु शेवटच्या षटकांमध्ये त्यांनी स्वतःचे बरेच विकेट्स गमावले म्हणून स्कोर कार्डवर स्कोर कमी राहिला.

 

 

Pimpri Chinchwad Police Recruitment : उद्या होणार पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा

 

गुजरात टायटन्स कडून बॅटिंग करताना रिद्धीमान सहाने गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात दिली. तो बाद झाल्यानंतर शुभमन गिल यांनी संघाच्या फलंदाजीची जबाबदारी घेतली. रिद्धिमान सहाने ताबडतोब 25 धावा काढल्या. त्यानंतर ‘इम्पॅक्ट खेळाडू’ म्हणून आलेल्या साई सुदर्शन ने सुद्धा शुभमन गिल बरोबर थोडी खेळी रचली. गुजरात टायटन्स कडून रिद्धिमान सहा (25), शुभमन गिल (63), साई सुदर्शन (22), कर्णधार हार्दिक पांड्या (8), विजय शंकर (27) अशा धावा काढल्या. अंतिम षटकांमध्ये राहुल तेवातिया (15) आणि राशिद खान (10) यांच्या मदतीने गुजरातने चेन्नईला 20व्या षटकात चार बॉल राखून पराजित केले. चेन्नई सुपर किंग्स कडून पहिलाच सामना खेळणारा राजवर्धन हंगारगेकरने 36 धावा देऊन 3 बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

 

 

 

आयपीएलची पहिलीच मॅच होती म्हणून चेन्नईच्या फलंदाजी ची सुरुवात एकदम (IPL 2023) रोमांचक वाटत होती. परंतु जसा ऋतुराज गायकवाड बाद झाला तेव्हापासून चेन्नईने असे सामन्यांमध्ये जास्त काहीच केले नाही. गुजरात टायटन्स ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा बरोबर निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्स ची वेगवान गोलंदाजी यावर्षी दुर्मिळ वाटतच होती. चिदंबरम स्टेडियम च्या बाहेर त्यांच्या वेगवान गोलंदाजीची अशीच परीक्षा होत राहणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.