KKR vs RCB : कोलकाताचा आरसीबीवर सहज विजय; सलामीवीर जोडी मोडताच आरसीबी ढेपाळली

एमपीसी न्यूज – कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चाललेंजर्स बेंगळुरूला 21 धावांनी हरवले. पॉईंट्स टेबल वर कोलकाता आता मुंबईच्या वर सातव्या स्थानावर आले आहेत.(KKR vs RCB) बेंगळुरूने काल स्वतःचा 8 पैकी चौथा सामना हरला. चिन्नास्वामी मैदानावर घरेलू समर्थकांसमोर बेंगळुरला कोलकातासमोर हार पत्करावी लागली . आयपीएलच्या 2023 च्या 36 व्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना जेसन रॉय आणि नारायण जगदीशन यांनी संतुलित सुरवात केली. नारायण जगदीशनने (27 धावा) याने सौम्य पारी खेळत जेसन रॉय (56 धावा) ला चांगली साथ दिली. व्यंकटेश अय्यरच्या 26 चेंडूंमध्ये 31 धावा व कर्णधार नितीश राणाच्या 21 चेंडूंमध्ये 48 धावा यामुळे कोलकाताला मधल्या षतकांमध्ये सामन्यावर नियंत्रण मिळवता आले. रिंकू सिंग (18 धावा) आणि डेव्हिड वीज (12 धावा) यांचा कॅमिओमुळे कोलकाता 200 धावांपर्यंत पोहोचली. आरसीबीकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगा आणि व्यशक विजय कुमार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.

 

 

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख – 35 वा – चंद्रचूड सिंग

विशाल लक्षाचा पाठलाग करताना इम्पॅक्ट प्लेअर फाफ डुप्लेसिस (17 धावा) हा लवकरच बाद झाला. परंतु त्याचा सलामीवीर जोडीदार, कर्णधार विराट कोहली याने 37 चेंडूंमध्ये 54 धावा काढल्या. आरसीबीचे जर सलामीवीर फलंदाज लगेच बाद झाले तर पुढचे फलंदाज हे सामन्यावर नियंत्रण मिळवायला कमी पडत आहेत. महिपाल लोमरोर (34 धावा) आणि दिनेश कार्तिक (22 धावा) यांचे सकारात्मक हेतू सुद्धा कमी पडले. (KKR vs RCB) आरसीबी हा सामना 21 धावांनी हरले. कोलकाताकडून गोलंदाजी करताना वरून चक्रवर्थी याने 3 बळी घेतले तर इम्पॅक्ट प्लेअर संदीप शर्मा व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. कोलकाताच्या गोलंदाजांनी चिन्नास्वामी स्टेडियम वर केलेला हा जणू एक पराक्रमच असावा.

आरसीबीची यंदा जिंकण्याची टक्केवारी साधारण 50 टक्के आहे. परंतु त्यांच्या सलामीवीर फलंदाजांमध्ये एकही लवकर बाद झाला तर उरलेले फलंदाज संघाला सावरून घेत नाहीत. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांचा खांद्यावर आरसीबीच्या फलंदाजीची मोठी जबाबदारी आहे. (KKR vs RCB) त्यावरून त्यांचे गोलंदाज हेही विसंगत कामगिरी करत आहेत. कोलकाताला हा विजय त्यांना अत्यंत गरज असलेली सकारात्मक चालना देऊ शकते. ते या संधीचा कसा लाभ मिळवतात हे बघणे मनोरंजक असेल .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.