SRH vs RR : हैदराबादचे नवाब आज भिडणार राजस्थानच्या राजपुतांशी

एमपीसी न्यूज – आज सुपर संडेच्या निमित्ताने आयपीएलमध्ये 2 सामने होणार आहेत. त्यामध्ये पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा होणार आहे. (SRH vs RR)  हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघ स्वतःच्या आयपीएल प्रवासाची उत्तम सुरुवात करण्याचा ध्येय घेऊन मैदानावर उतरतील. 

हैदराबादचा संघ हा स्वतःच्या होम पीचवर खेळत असून त्यांच्याकडे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असणार असे वाटत आहे. पहिल्या सामन्यासाठी त्यांचा संघ असा आहे. मयंक अगरवाल, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक , राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स , समर्थ व्यास, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार (C), आदिल रशीद , उमरान मलिक. इम्पॅक्ट प्लेयर कोण असेल हे नाणेफेक कोण जिंकते त्याच्यावरच ठरेल. जर हैदराबाद ची पहिली फलंदाजी झाली तर दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपण नटराजन किंवा मयंक मार्कंडे या दोघांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बघू शकतो. परंतु हैदराबाद ची पहिली गोलंदाजी झाली तर राखीव खेळाडूंमधून अजून एक फलंदाज आपण येताना बघू शकतो.

Dapodi : पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करत मागितली खंडणी

राजस्थान रॉयल्स हे स्वतःचा पहिला सामना घरापासून लांब खेळत आहेत. त्यांचा पहिल्या सामन्यासाठीचा संघ असा आहे.  जोस बटलर , यशस्वी जयस्वाल, देवदत्त पड्डिकल, संजू सॅमसन(C), शिम्रन हेटमायर*, ध्रुव जुरेल, रियान पराग, रविचंद्रन आश्विन, ओबेड मॅककॉय , ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल. (SRH vs RR) बाकीच्या संघांसारखंच इम्पॅक्ट प्लेयर हा नाणेफेक वरती राजस्थान ठरवतील. जर प्रथम फलंदाजी आली तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संदीप शर्मा, नवदीप सैनिक येऊ शकतात. जर प्रथम गोलंदाजी झाली तर नवदीप सैनिक किंवा संदीप शर्मा पैकी एका कुणाला तर संघात ठेवून कुठल्यातरी फलंदाजाला हा दुसऱ्या इनिंग मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राजस्थान आणेल.

कागदावर राजस्थान रॉयल्सचा संघ हा हैदराबाद पेक्षा मजबूत दिसत आहे. परंतु हैदराबाद स्वतःच्या घरी राजीव गांधी स्टेडियम वर खेळणार आहे. (SRH vs RR) त्याच्यामुळे समर्थकांचा चांगला प्रतिसाद हैदराबादला मिळेल अशी शक्यता आहे. त्यावरून राजीव गांधी स्टेडियम चे पीच हे हैदराबाद संघाने नक्कीच स्वतःच्या ताकदीनुसार करून घेतले असणार आहे. तर मॅच मध्ये काय होते हे बघावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.