Jeff Bezos : जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस अमॅझॉनचे सीईओ पद सोडणार

एमपीसी न्यूज – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेजोस अमॅझॉनचे सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी अँडी जाँसी हे कंपनीचे नवे सीईओ असतील. जेफ बेजोस निवृत्त होणार नसून ते आता काही अन्य गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जेफ बेजोस हे निवृत्त होणार नाहीत तर, अमेझॉनच्या एक्झीक्यूटिव बोर्डाचे एक्झीक्युटिव्ह चेअरमन पद ते सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रोजेक्ट्सवर आपले होल्डिंग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. बेजोस अशी पावलं उचलण्यासाठी तयार आहेत कारण त्यांच्याकडे प्रचंड कॅपिटल आहे.

1994 साली स्थापन झालेल्या अमेझॉनचे 1996 मध्ये जेफ यांनी सीईओ पद सांभाळले. इंटरनेटवर पुस्तक विक्रीची सुरुवात करून त्यांनी कंपनी कारभाराची सुरवात केळी. शेअरधारकांना उद्देशून बोलताना बेजोस म्हणाले, मी राजीनाम्यासाठी 5 जुलै 2021 ही तारीख निवडली आहे. कारण या दिवशी अमेझॉनला 27 वर्षे होत आहेत. 57 वर्षीय बेजोस यांची संपत्ती 137 अब्ज डॉलर्स असून जागतिक श्रीमंत यादीत सध्या ते दोन नंबरवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.