गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Crime News : वाकड येथे घडफोडीत एक लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड येथे बंद घरात घरफोडीत करत चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार 15 ते 16 ऑगस्ट या कालावधीत चौधरी पार्क येथे घडला आहे.

 

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांचे कटुंबीय बंगळूर येथे गेले होते. त्याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील ड्रॉव्हरमधील 56 हजार 250 रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, 8 हजार रुपयांचे चांदिचे दागिने व रोख 35 हजार रुपये असा एकूण 99 हजार 250 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

spot_img
Latest news
Related news