Chinchwad News : राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र उद्यानातील ‘जिजाऊ सृष्टी’ व ‘आपले चिंचवड व्यासपीठ’चे लोकार्पण

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 18 चिंचवड येथील राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र उद्यानामधील ‘जिजाऊ सृष्टी’ तसेच शहरातील विविध क्षेत्रातील कलाकार बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या ‘आपले चिंचवड व्यासपीठ’ याचे लोकार्पण करण्यात आले. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.04) लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, स्वीकृत नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, माजी नगरसदस्या उमा खापरे, थोर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.

तसेच, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला गावडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे, महेश कुलकर्णी, मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे माजी मनापा अधिकारी सुभाष माछरे तसेच शहरातील विविध कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व कलाकार मंडळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.